भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी क्रिकेट मालिका: रोहित शर्माच्या पुनरागमनाची शक्‍यता

मैदान – ऍडिलेड
वेळ – सकाळी 5.30 वाजता सुरु

ऍडिलेड: भारत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये आज पासून कसोटी मालिकेला सुरूवात होणार असून स्टिव्ह स्मीथ आणि डेव्हिड वॉर्नरयांच्या अनुपस्थीतीत ऑस्ट्रेलियन संघाची भारतीय संघासमोर कसोटी लागणार असून भारतीय संघाला आपल्या सहाव्या क्रमांकावरील फलंदाजाचा पेच सोडविण्याचे लक्ष या मालिकेद्वारे असणार आहे.

-Ads-

इंग्लंड आणि वेस्ट इंडीज येथे भारताने पाच गोलंदाजांना खेळविण्याची पॉलिसी या दौऱ्यात भारतीय संघाने बदलली असून सामन्याच्या आदल्या दिवशी घोषीत केलेल्या संघात तीन वेगवान गोलंदाज आणि एका फिरकी गोलंदाजाचा समावेश केला असून पहिल्या सामन्याद्वारे रोहित शर्मा कसोटी संघात पुनरागमन करण्याची शक्‍यता वर्तविण्यात येते आहे. भारतीय संघा बरोबरच ऑस्ट्रेलियन संघानेही आपला संघ जाहिर केला असून त्यांच्या संघात त्यांनी नवोदित फलंदाज पिटर हॅंडस्कोम्बला संघात स्थान दिले आहे. तसेच, पृथ्वी शॉ दुखापत ग्रस्त झाल्यामुळे लोकेश राहुल आणि मुरली विजय यांना सलामीला संधी मिळण्याची शक्‍यता आहे.

यावेळी भारतीय संघातून भुवनेश्‍वर कुमार, कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजायांना वगळण्यात आले आहे. तर भुवनेश्‍वरच्या जागी इशांत शर्माला संघात स्थान मिळाले आहे. तर, ऍडलेडच्या खेळपट्टीवर जलदगती गोलंदाजांना मदत मिळणार असल्याने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने एकाच फिरकी गोलंदाजाला खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. इंग्लंड आणि वेस्ट इंडीज दौऱ्यात चांगली कामगिरी करणाऱ्या रविंद्र जडेजा ऐवजी अनुभवी रविचंद्रन अश्‍विनवर विश्‍वास दाखवताना त्याची संघात निवड केली गेली आहे. तर, कुलदीप यादवला विश्रांती देण्यात आली आहे. मात्र, अश्‍विनची ऑस्ट्रेलियातील कामगिरी तितकी चांगली झालेली नाही. त्याने ऑस्ट्रेलियात 6 कसोटीत 21 विकेट घेतल्या आहेत. अश्विनने कसोटी कारकिर्दीत 25.44 च्या सरासरीने 336 विकेट घेतल्या आहेत आणि या तुलनेत ऑस्ट्रेलियातील त्याची कामगिरी आतापर्यंत निराशाजनक राहिलेली असल्याणे त्याच्या निवडी वरुन वादंग होण्याची शक्‍यता वर्तवली जाते आहे. तर, या सामन्यासाठी भारताने अतिरिक्त फलंदाज खेळवण्याचा निर्णय घेतल्यामुळे भुवनेश्वर कुमारला संघात स्थान मिळाले नाही.

तसेच सामन्यासाठी घोषीत केलेल्या 12 खेळाडूंमध्ये रोहित शर्मा आणि हनुमा विहारीयांचा समावेश असून या दोघांपैकी एकालाच अंतीम आकरा जणांमध्ये स्थान मिलनार असल्याने रोहित की हनुमा असा पेच अंतिम संघ निवडताना असणार आहे. त्यातच भारतीय संघ चार पुर्णवेळ गोलंदाजांसह खेळणार असल्याने अतिरिक्त गोलंदाजीची कमतरता भासत असल्याने रोहितच्या ऐवजी हनुमा विहारीला अंतिम संघात स्थान मिळण्याची शक्‍यता वर्तविण्यात येते आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियानेही पहिल्या सामन्यासाठी अंतिम अकरा खेळाडूंची नावे जाहीर केली असून पहिल्या सामन्यातून सलामीवीर फलंदाज मार्कस हॅरिसचे कसोटी पदार्पण होणार आहे. तर, अन्य सलामीवीर उस्मान ख्वाजा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येणार आहे. तसेच ऑस्ट्रेलियाने आपल्या संघातून उपकर्णधार मिचेल मार्शला वगळले असून त्यांच्या या निर्णया बद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

प्रतिस्पर्धी संघ –
भारत – विराट कोहली (कर्णधार), अजिंक्‍य रहाणे, लोकेश राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), आर अश्‍विन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलियाः टीम पेन (कर्णधार, यष्टीरक्षक), मार्कस हॅरिस, ऍरोन फिंच, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पिटर हॅंडस्कोम्ब, ट्रॅव्हीस हेड, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)