भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका: सराव सामन्यावर पावसाचे सावट 

एकमेव सराव सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने केली कुमकुवत विरोधी संघाची निवड 

स्थळ – सिडनी क्रिकेट ग्राऊंड 
वेळ – सकाळी 10.30 पासून 

सिडनी: टी-20 मालिकेनंतर येत्या सहा डिसेंबर पासून भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. भारतीय संघाला आता पर्यंत एकदाही ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे पहिला मालिका विजय मिळवण्याचे ध्येय घेऊन मैदानात उतरणाऱ्या भारतीय संघासाठी या मालिके पुर्वी एकमेव सराव सामन्याचे आयोजन करण्यात आलेले असून या सामन्यात भारतीय संघ जरी आपल्या संपुर्ण ताकदिनीशी उतरणार असला तरी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने या सामन्यासाठी कुमकूवत संघ मैदानात उतरवला आहे. त्यातच या सामन्यावर पावसाचेही सावट असणार आहे.

भारतीय संघाने इंग्लंड दौऱ्यातील पराभवातून धदा घेताना ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सराव सामन्याची मागणी केली होती. त्याला ऑस्ट्रेलियान क्रिकेट बोर्डाने हिरवा कंदील दाखवला होता. त्यानुसार एकमेव सराव सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात भारतीय संघ कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसून येणार आहे. तर, क्रिकेट ऑस्ट्रेलिया एलेवनचा संघ सॅम व्हाईटमनच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे.

इंग्लंड दौऱ्तार भारतीय संघाने आपला चार दिवसीय सराव सामना एक दिवस कमी करताना तीन दिवसीय करायला लावला होता. त्यामुळे तेथिल दौऱ्यात भारतीय संघाला म्हणावा तसा सराव करता आला नव्हता. त्यामुळे बीसीसीआयने या दौऱ्यात सराव सामन्याचे स्वतंत्र मागणी करताना त्याच्या स्वरूपात बदल केले जाणार नसल्याची ताकिदही दिली होती. मात्र, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या सामन्यासाठी डार्सी शॉर्ट आणि डेव्हिड ग्रॅंट वगळता सर्वच्या सर्व खेळाडू हे नवोदित आणि प्रथम श्रेणी सामनेही कमी खेळलेल्या खेळाडूंना संघात स्थान देऊन तीन दिवसातच हा संपावा अशी व्यवस्था केली आहे. त्यामुळे भारतीय संघाला पहिल्या सराव सामन्यात जास्त सरावाची संधी मिळू नये अशी व्यवस्था केली आहे. त्यातच सामन्यावर पावसाचेही सावट असल्याने भारतीय संघाला या सामन्यात कितपत सराव करायला मिळतो हे पहाणेही औत्स्युक्‍याचे असनार आहे.

सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कसून सराव 

भारतीय कसोती संघातील सदस्य असलेले अजिंक्‍य रहाणे, मुरली विजय, पृथ्वी शॉ, हनुमा विहारी आणि पार्थिव पटेलयांनी 22 नोव्हेंबर पासूनच ऑस्ट्रेलियामध्ये येऊन सरावाला सुरूवात केली होती. ज्यात भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगरही त्यांच्या समवेत समाविष्ट झालेले होते. यावेळी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या विरोधात खेळता यावे यासाठी श्रीलंकेचा उद्योन्मूख डावखूरा वेगवान गोलंदाज नुवान सेनेविररत्नेहा गोलंदाजी करत होता. तर, सराव सत्रात भारतीय संघाला ऍडम झम्पाच्या गोलंदाजीचा सामना करता यावा यासाठी वॉशिंग्टन सुंदर भारतीय फलंदाजांना सरावात मदत करताना या वेळी दिसून आला.

प्रतिस्पर्धी संघ – 
भारत – विराट कोहली (कर्णधार), अजिंक्‍य रहाणे, रविचंद्रन अश्‍विन, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, भुवनेश्‍वर कुमार, मोहम्मद शमी, ऋषभ पंत, पार्थिव पटेल, चेतेश्‍वर पूजारा, लोकेश राहुल, इशांत शर्मा, रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, हनुमा विहारी, मुरली विजय, उमेश यादव.
क्रिकेट ऑस्ट्रेलिया एलेवन – सॅम व्हाईटमन, मॅक्‍स ब्रायंट, जेक कार्डर, जॅक्‍सन कोलमन, हॅरी कॉनवे, डॅनिएल फॅलिन्स, डेव्हिड ग्रॅंट, ऍरोन हार्डी, जॉनेथन मेर्लो, हॅरी नाईल्सन, डार्सी शॉर्ट, परम उप्पल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)