भारतीय संघाची खरी मदारही फलंदाजांवरच आहे. लोकेश राहुलला गवसलेला फॉर्म ही संघव्यवस्थापनासाठी सुखद डोकेदुखी असून त्यामुळे कर्णधार विराट कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरण्याची शक्‍यता आहे. शिखर धवन व रोहित शर्मा या सलामी जोडीनंतर राहुल व विराट तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर येतील. तर सुरेश रैना व महेंद्रसिंग दोनी पाचव्या व सहाव्या क्रमांकावर आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या सातव्या क्रमांकावर असल्यामुळे भारताचीही फलंदाजी सातव्या क्रमांकापर्यंत आहे.

भुवनेश्‍वरची पाठदुखी बरी झाली असल्यास तो उमेश यादवच्या साथीत नवा चेंडू हाताळेल. फिड़कीसाठी युझवेंद्र चाहल हा पहिला पर्याय असला, तरी कुलदीपलाही संधी मिळू शकेल. जादा गोलंदाज खेळविण्याचा विचार झाल्यास शार्दूल टाकूर किंवा सिद्धार्थ कौल यांना संधी मिळेल. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेनंतर भारतीय संघाने 27 वन डे सामने केळले असून त्यात किमान एक रिस्ट स्पिनर खेळविला आहे. कुलदीपने 20 सामन्यांत 39, तर चाहलने 23 सामन्यांत 43 बळी घेतले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)