भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामना तिसरा दिवस

साऊथहॅम्पटन, – भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात आज तिसऱ्या दिवशी उपहारापर्यंत इंग्लंडने 3 बाद 92 अशी मजल मारली. काल दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने बिनबाद 6 धावा केल्या होत्या. त्यापुढे खेळताना आज पहिल्या सत्रात ऍलिस्टर कूक, मोईन अली आणि कीटन जेनिंग्स हे तीन गडी इंग्लंडने गमावले. बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांनी अनुक्रमे 1-1 बळी टिपला.

त्याआधी भारताचा पहिला डाव 273 धावांवर आटोपला. चेतेश्वर पुजाराने एकाकी झुंज देत नाबाद 132 धावांची खेळी केली. पण त्याला इतर फलंदाजांची अपेक्षित साथ मिळाली नाही. त्यामुळे भारताला डावाअखेरीस केवळ 27 धावांची आघाडी मिळवता आली. पहिल्या दिवसअखेर भारताने बिनबाद 19 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या पहिल्या सत्रात भारताने शिखर धवन (23) आणि लोकेश राहुल (19) असे दोन गडी गमावले. हे दोघेही ब्रॉडच्या गोलंदाजीवर बाद झाले. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली या जोडीने डाव सावरला. पण दुसऱ्या सत्रात कोहली 46 धावांवर बाद झाला. पाठोपाठ उपकर्णधार अजिंक्‍य रहाणे 11 तर नवोदित ऋषभ पंत 0 धावांवर माघारी परतला. त्यामुळे चहापानापर्यंत भारताची अवस्ठा 5 बाद 181 अशी झाली होती. तिसऱ्या सत्रातही फिरकीपटू मोईन अलीने आपल्या फिरकीची जादू कायम ठेवली. त्याने हार्दिक पांड्या (4), अश्विन (1) आणि मोहम्मद शमी (0) यांना झटपट तंबूत धाडले. बुमराने पुजाराला चांगली साथ दिली. पण अखेर तो बाद झाला. इंग्लंडकडून मोईन अलीने 5, ब्रॉडने 3 तर स्टोक्‍स आणि कुर्रानने 1-1 बळी टिपला.

त्याआधी काल इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद 246 धावा केल्या. या सामन्यात संधी मिळालेल्या सॅम कुरानने आपली निवड सार्थ ठरवत भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. त्याने 136 चेंडूंत 78 धावांची झुंजार खेळी केली. त्याला मोईन अलीने चांगली साथ दिली. पहिल्या डावात भारताकडून बुमराहने 3, इशांत शर्मा, मोदम्मद शमी आणि अश्विनने प्रत्येकी 2 आणि पांड्याने 1 बळी टिपला.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)