भारत राखीव बटालियनच्या समादेशकास लाचप्रकरणी अटक 

कोल्हापूर – गट मुख्यालय येथील क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यासाठी खेळाडू जवानांना शासनाकडून दिला जाणारा आहार, भत्ता नियमित वाटप करण्यासाठी व सोसायटीकडून एक लाख रुपये कर्ज मंजूर करण्यासाठी जवानांकडून 40 हजार रुपयांची लाच घेतल्याचे सिद्ध झाल्याने भारत राखीव बटालियन 3’च्या समादेशकास निवृत्तीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तब्बल सहा महिन्यांनी मुंबईत राहत्या घरी अटक केली.

संशयित खुशाल विठ्ठल सपकाळे (वय 59, रा. मरोशी, भवानीनगर, मरोळ, मुंबई) असे त्याचे नाव आहे. न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. लाच मागण्यासाठी व इतर गैरकारभारासाठी सपकाळे पंटर रॉबर्टच्या मोबाईलचा वापर करत होता. त्याचाही शोध सुरू आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक गिरीश गोडे यांनी दिली.

दरम्यान, संशयित सपकाळेच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स व व्हॉटस्‌ ऍपची माहिती काढली असता, त्याच्याकडे कारचालक म्हणून काम करणारा पंटर रॉबर्ट याच्या नावावर तो मोबाईल असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांकडे हा नंबर सपकाळे साहेब या नावाने नोंद आहे.पैशाची देवाणघेवाण व इतर गुंतवणूक, गैरकारभार करण्यासाठी सपकाळे या मोबाईलचा वापर करीत होता. पोलिसांनी त्यांचे कॉल रेकॉर्डही ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यात सपकाळे याचा संबंध असल्याचे तपासाअंती स्पष्ट झाल्यानंतरच मंगळवारी त्यास मुंबई येथे अटक केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)