भारत म्हणजे शुल्कांचा शहेनशहा : डोनॉल्ड ट्रम्प 

वॉशिंग्टन: भारत म्हणजे शुल्कांचा शहेनशहा अशा शब्दांत अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी भारतावर टीका केली आहे. मेक्‍सिको आणि कॅनडाबरोबर नवीन व्यापार करारांची घोषणा करत असताना ट्रम्प यांनी भारताला अशी कोपरखळी मारली आहे. उत्पादनांवर भारत जादा शुल्क लावत आहे असे त्यांचे म्हणणे आहे.
अमेरिकन भारत अमेरिकेबरोबर व्यापार करार का करू इच्छित आहे, या प्रश्‍नाला उत्तर देताना ट्रम्प यांनी सांगितले की, आपल्याला खुश करण्यासाठी भारत अमेरिकेबरोबर व्यापार करू इच्छित आहे. मेक्‍सिको आणि कॅनडाबरोबर झालेल्या व्यापार करारांचे महिती देताना त्यांनी ज्या देशांबरोबर व्यापार कराराची बोलणी चालू आहेत, त्यांची माहिती देताना जपान, युरोपियन संघ, चीन आणि भारत या चार देशांची नावे घेतली. या देशांबरोबर अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी रॉबर्ट लायटायझर बोलणी करत आहेत. अमेरिकेने भारतीय उत्पादनांवर जास्त आयात शुल्क आकारू नये यासाठी भारत अमेरिकेबरोबर व्यापार करार करू इच्छित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
2 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)