भारत-म्यानमार संबंधांतील नवे पर्व-मैत्रीचा पूल

नाएप्यिडा (म्यानमार) – भारत आणि म्यानमार या दोन शेजारी राष्ट्रात संबंधांचे एक नवीन पर्व सुरू झाले. भारत आणि म्यानमार यांना जोडणाऱ्या फ्रेंडशिप ब्रिज या मैत्रीच्या पुलाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

म्यानमारमधील तामू येथे एका भव्य समारंभात भारताला लागून असलेली ही सीमा खुली करण्यात आली. मणिपूरच्या सीमेवरील मोरे शहराला लागून असलेल्या या पुलामुळे कोणाही भारतीयाला विशेष परमिटची आवश्‍यकता लागणार नाही.
भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या 11 मे रोजीच्या म्यानमार दौऱ्यात नेपिता येथे दोन देशातील सीमा खोलण्या संबंधी समझोता झाला होता. या समझोत्यानुसार दोन्ही देशांचे नागरिक परपरांच्या देशात बिना परमीट्‌ 16 किमी पर्यंत जाऊ शकणार आहेत. दोन्ही देशांतील मार्गाने संपर्क सुधारण्याच्या दृष्टीने दोन मोठे प्रकल्प आणि 69 पुलांच्या नूतनीकरणाचे काम सन 2020 पर्यंत पूर्ण होणार आहेत.

-Ads-

म्यानमार आणि भारत यांच्यादरम्यान 1640 किमी लांबीची सीमारेषा आहे. दहशतवादाने प्रभावीत नागालॅंड आणि मणिपूरसह पूर्वोत्तरातील अनेक राज्यांच्या सीमा म्यानमारला लागून आहेत.

भारत-म्यानमार-थायलंड मिळून करत असलेला महत्त्वाकांक्षी 1400 किमी लांबीचा आंतरराष्ट्रीय राजमार्ग 2019 पर्यंत पूर्ण होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)