भारत माझा देश आहे…(प्रभात open house)

‘भारत माझा देश आहे..सारे भारतीय माझे बांधव आहेत’… किती अर्थपूर्ण प्रतीज्ञा आहे आपली.. यामध्ये आपुलकी , प्रेम, आपल्या देशाविषयीचा अभिमान दिसतो. खरंच आपण धन्य आहोत की या भारत भूमीत आपला जन्म झाला.. स्वामी विवेकानंद त्यांच्या एका भाषणात बोलले होते की अमेरिका, जपान वा इतर देशांकडून आपल्याला आधुनिक तंत्रज्ञान, त्यांनी लावलेले नवनवीन शोध आपण घेऊ शकतो.  पण कोणाला जर ‘संस्कृती’ हवी असेल तर मात्र ती फक्त आणि फक्त आपल्या भारतातच मिळेल. स्वामींना किती  गर्व होता आपल्या भूमातेवर यावरून आपल्याला कळतेच.
यंदा १५ ऑगस्ट ला आपण ७१ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत. कित्येक जणांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन आपली भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून दिलं.. ध्येय वेडे होते सर्व.  क्रीडा क्षेत्रा मधे आपल्यात पी.व्ही. सिंधू हीने उत्कृष्ठ कामगिरी करून देशाला पदक मिळवून दिले…  किती अभिमानास्पद बाब आहे ही मात्र तितकीच लाजीरवाणी बाब म्हणजे गुगल वर तीची जात शोधली गेली ही मोठी शोकांतिका आहे.

राजकीय दृष्टया विचार कराल तर मात्र कलाम सर,वाजपेयी, यशवंतराव चव्हाण इतर काही व्यक्ती सोडता फक्त स्वकीय फायद्याचे राजकारण चालू आहे.  जिकडं खोबरं तिकडं चांगभले ही अवस्था राजकीय नेत्यांची झालीय. सामान्य जनता जेव्हा काम करेल तेव्हाच त्यांच्या पोटाला अन्न भेटते त्यामुळे त्यांच्या विरूद्ध आवाज ते उठवू शकत नाहीत. आणि याचाच फायदा घेत ते आपला स्वार्थ साधत राहतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मी तरी स्वतः पासून सुरुवात केलीय मला परफेक्ट बनवण्याची आणि आशा आहे प्रत्येक जण सुद्धा नक्कीच स्वतःला आणि भारत मातेला परफेक्ट करण्यासाठी प्रयत्न करेल.
जय हिंद!
 

– जीत शिंदे, पुणे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)