भारत-मंगोलिया यांच्यात महत्वाचे करार; अनेक बाबींचे आदानप्रदान होणार

मंगोलिया : भारत आणि मंगोलिया यांच्यात महत्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी या दौऱ्यात मंगोलियाचे पंतप्रधान यु. खुरेलसुख आणि परराष्ट्रमंत्री दाम दिन सुखबात्तर यांची मंगोलियाची राजधानी उलानबाटार येथे भेट घेतली. त्यादरम्यान हे करार झाले.

दोन्ही देशात उर्जा, सूचना व प्रसारण, हवामानशास्त्र, पायाभूत सुविधा आणि सेवा अशा वेगवेगळ्या विषयांच्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि सुविधांचे आदानप्रदान होण्यासाठी दोन्ही देशांनी सहमती दर्शविली आहे. सुषमा स्वराज या ४२ वर्षांमध्ये मंगोलिया देशाचा दौरा करणाऱ्या भारताच्या पहिल्या परराष्ट्र व्यवहार मंत्री आहेत. या दौऱ्यात ‘भारत – मंगोलिया संयुक्त परामर्श बैठक’ देखील पार पडली. या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व सुषमा स्वराज यांनी केले असून या बैठकीचे सह-अध्यक्ष पदही त्यांनी भूषविले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)