भारत बंदला गुजरातेत संमिश्र प्रतिसाद 

अहमदाबाद – कॉंग्रेस सह अन्य पक्षीयांनी पुकारलेल्या भारत बंदला गुजरातेत संमिश्र प्रतिसाद मिळाला. हा बंद यशस्वी झाल्याचा दावा कॉंग्रेसने केला असला तरी सरकारीबाजूकडून मात्र बंदचा फारसा प्रभाव दिसला नाही असे सांगण्यात आले.

गुजरात प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष अमित चावडा आणि कॉंग्रेसचे गुजरात प्रभारी राजीव सातव यांच्यासह तीनशे कॉंग्रेस कार्यकर्त्यांना बंद काळात प्रतिबंधात्मक आदेश मोडून निदर्शने केल्याच्या कारणावरून ताब्यात घेण्यात आले. अहमदाबाद, राजकोट, मेहसाणा या जिल्ह्यांमध्ये कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी लोकांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले. तेथील शिक्षण संस्था आणि बरेचसे पेट्रोलपंप आज बंद होते.

राजकोटला सरकारी शाळा सुरू होत्या पण खासगी शाळांनी मात्र सुट्टीच दिली होती. कॉंग्रेस निदर्शकांनी छोटाउदयपुर आणि सूरत भागात रस्त्यावर पेटते टायर टाकून काही काळ रस्ता वाहतूक अडवली होती. पक्षाचे प्रदेश प्रवक्ते मनिष दोषी यांनी हा संप यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. बंदचा राज्यात काही विशेष प्रभाव दिसून आला नाही असे गुजरात पोलिसांच्या नियंत्रण कक्षाने म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)