“भारत बंद’ला अल्प प्रतिसाद

व्यवहार सुरळीत : स्कूल बस, पीएमपी बसेसवर दगडफेक

पुणे – सातत्याने होणाऱ्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या “भारत बंद’ला पुण्यात अल्प प्रतिसाद मिळाला.कॉंग्रेससह समविचारी पक्षांनी हा बंद पुकारला होता. पण, जनजीवनावर कुठलाही परिणाम न होता व्यवहार सुरळीत होते. पीएमपी बस फोडण्याच्या किरकोळ घटना वगळता बंद शांततेत पार पडला.

“भारत बंद’च्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी सकाळपासूनच बंदोबस्त तैनात केला होता. अनूचित प्रकार टाळण्यासाठी खबरदारी घेतली गेली. कॉंग्रेस, राष्ट्रवादीसोबतच मनसेनेसुद्धा या बंदला पाठिंबा दिला. त्यामुळे काही भागात मनसे कार्यकर्त्यांनी “मनसे स्टाइल’ने आंदोलन करत तोडफोड केली. केळकर रस्त्यावर मनसे कार्यकर्त्यांनी एक बस फोडली. त्याशिवाय पाच वाहनांचे किरकोळ नुकसान तर तीन बसेसच्या टायर्सची हवा सोडण्यात आल्या.

बंद काळात तोडफोड न करता शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करण्याचे आवाहन कॉंग्रेसने केले होते. त्यामुळे आज सकाळपासूनच शहराच्या विविध भागात फिरून दुकानदार व व्यापाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन कॉंग्रेसचे पदाधिकारी करत होते. सकाळी शहराच्या मध्यवस्तीतून घोडागाडीतून फिरुन इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला. दुपारी कॅम्प परिसरात मोर्चा काढण्यात आला. यावेळी अ. भा. कॉंग्रेसच्या चिटणीस सोनल पटेल व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. शहराध्यक्ष रमेश बागवे व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.

काही ठिकाणी स्कूल बसवर दगडफेकीचे प्रकार झाले. ते वगळता अन्य अनुचित प्रकार घडला नाही. बंदच्या पार्श्‍वभूमीवर पालकांनी पाल्यांना शाळेत पाठविले नाही. पण, शाळा नियमित सुरू होत्या. याशिवाय बॅंका व शासकीय कार्यालयेसुद्धा नियमित सुरू होती.

इंधन दरवाढ करून मोदी सरकार जनतेची पिळवणूक करीत आहेत. जनतेच्या वेदना व आक्रोश सरकारपर्यंत पोहचावा, म्हणूनच हा बंद पुकारण्यात आला होता. सरकारच्या चुकीच्या धोरणांचा विरोध आम्ही विरोध करत राहू.
-सोनल पटेल, चिटणीस, अ. भा. कॉंग्रेस.


मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे भारतीय रुपयांची किंमत डॉलरपेक्षा दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. या सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. त्यामुळे महागाईने सर्वसामान्यांना जगणे कठीण झाले आहे.
– सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी कॉंग्रेस


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)