नवी दिल्ली: विरोधकांनी पुकारलेल्या भारत बंदच्या दिवशीही इंधन दरवाढ थांबली नाही. बंदच्या दिवशी लिटरमागे पेट्रोल 23 पैशांनी तर डिझेल 22 पैशांनी महागले. त्यामुळे इंधन दरांनी नवनवे उच्चांक गाठण्याचे सत्र अबाधित राहिले. ऑगस्टच्या मध्यापासून आतापर्यंत लिटरमागे पेट्रोलच्या दरात 3.65 रूपयांनी तर डिझेलच्या दरात 4.06 रूपयांनी वाढ झाली आहे. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रूपयाच्या मुल्याने नीचांकी पातळी गाठण्याचे सत्रही कायम असल्याने कच्च्या इंधनाच्या आयातीसाठी जादा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे इंधन दरवाढ होत आहे. दरम्यान, इंधन दरांच्या भडक्‍यापासून जनसामान्यांना दिलासा देण्यासाठी कर कमी करण्याची मागणी विरोधक करत आहेत. मात्र, करामध्ये कपात करण्याचा केंद्र सरकारचा कुठलाही विचार नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)