भारत पेट्रोलियमची उमंग, फिनो बॅंकसेवा लाभदायी

उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांचा विश्वास

भोर- भोर सारख्या अतिदुर्गम डोंगरी तालुक्‍यात भारत पेट्रोलियम आणि अमित सर्हिस सेंटर रामबाग यांनी केंद्र सरकारची उमंग आणि फिनोबॅंक सेवा संयुक्तपणे सुरु केली आहे. येथील गरजू लोकांसाठी ही योजना निश्चितपणे फलदायी ठरेल, असा विश्वास भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी व्यक्त केला.
भारत पेट्रोलियम आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने भोर (रामबाग) येथील अमित सर्व्हिस सेंटर येथे उमंग आणि फिनो बॅंकेच्या ऑनलाईन सेवेचा लोकार्पण सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी राजेंद्रकुमार जाधव बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीपीसीएलचे डीलर महादेव यादव होते. यावेळी भारत पेट्रोलियमचे पुणे विभागीय व्यवस्थापक मिहीर जोशी, भोर तालुका पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संतोष हराळे, भारत पेट्रोलियमचे सेल्स अधिकारी भानुप्रताप, अमोल सुपले, उमंगचे महेश मोरे, भोर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भुजंगराव दाभाडे, अदित्य यादव, माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे आदी उपस्थित होते.
गट विकास अधिकारी संतोष हराळे यांनी आपल्या भाषणात उमंग सेवा आणि फिनो एटीएम सेवेचे स्वागत करुन या योजनेमुळे पेट्रोल डिझेल बरोबरच नागरिकांना त्यांचे दैनंदिन जीवनात लागणारे सर्व प्रकारचे दाखले काही मिनीटांत उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. मिहीर जोशी म्हणाले की, जिल्ह्यात भारत पेट्रोलियम तर्फे सीएनजी आणि बायोगॅस सारख्या योजना पुढील दोन वर्षांत कार्यत करणार असून त्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. पुढील वर्षांपासून कंपनीचा 5 हजार बायोगॅस सुरु करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पासाठी 10 कोटींची सबसिडी दिली जाणार आहे. कार्यक्रमात मान्यवरांचे हस्ते विविध दाखल्यांचे वाटप व भारत महोत्सव या लकी ड्रॉ तील विजेत्यांना फ्रिज, गॅस शेगडी, सिल्व्हर कॉईन, व मोबाईलचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल पवार यांनी केले तर आभार महादेव यादव यांनी मानले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)