भारत-पाक मालिकेबद्दल धोरण कळवा – बीसीसीआय

नवी दिल्ली – पाकिस्तानविरुद्ध द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळण्याबाबत भारताचे धोरण काय आहे, याबाबतीत औपचारिकरीत्या माहिती देण्याची मागणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) केंद्र शासनाकडे केली आहे.
भारत व पाकिस्तान या दोन देशांमधील चिघळत असलेल्या राजकीय परिस्थितीमुळे उभय देशांमधील द्विपक्षीय क्रिकेट मालिकांवर 2012 पासून अघोषित बंदी घालण्यात आली आहे. तेव्हापासून भारत किंवा पाकिस्तान संघ एकमेकांशी द्विपक्षीय मालिका खेळलेले नाहीत. केंद्र शासनाच्या परवानगीशिवाय द्विपक्षीय मालिका शक्‍य नसल्याचे बीसीसीआयने वेळोवेळी स्पष्ट केले आहे.

त्यामुळेच पाकिस्तानने आयसीसीकडे तक्रार केली असून 2014 मध्ये उभय क्रिकेट मंडळांनी स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य कराराचे पालन करीत नसल्याबद्दल बीसीसीआयकडून 7 कोटी डॉलर्स नुकसानभरपाईची मागणी केली आहे. आयसीसीच्या लवादाने या प्रकरणी एक ते तीन ऑक्‍टोबर 2018 या कालावधीत दुबई येथे सुनावणी घेण्याचे निश्‍चित केले आहे. परिणामी बीसीसीआयने केंद्र शासनाकडे स्पष्टीकरणाची मागणी केली आहे.

पाकिस्तानशी पाकिस्तानमध्ये किंवा भारतात किंवा अन्य ठिकाणी द्विपक्षीय मालिका खेळविण्याबाबत भारताचे धोरण नक्‍की काय आहे. तसेच अशी मालिका खेळविण्यासाठी केंद्र शासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्‍यक आहे काय, अशी लेखी विचारणाही बीसीसीआयने केंद्राकडे केली आहे. भारत व पाकिस्तानमधील या वादावर निकाल देण्यासाठी नेमण्यात आलेल्या लवादाच्या अध्यक्षपदी मायकेल बेलॉफ यांची नियुक्‍ती करण्यात आली असून यान पॉलसन व डॉ. ऍनाबेल बेनेट हे लवादाचे अन्य सदस्य आहेत. या लवादाचा निर्णय उभय मंडळांवर बंधनकारक असून त्याविरुद्ध अपील करता येणार नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)