भारत-पाक दरम्यान मिठाईची देवाणघेवाण करण्याच्या परंपरेला खंड

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान दरम्यान, स्वांतत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, दिवाळी किंवा महत्त्वाच्या दिवशी दोन्ही सीमा दलाकडून मिठाईची देवाणघेवाण होते, मात्र यावेळी दोन्ही देशांतील सीमेवर तणावाचे वातावरण असल्याने मिठाईची देवाणघेवाण करण्याच्या परंपरेत खंड पडला असल्याचे सांगण्यात येत आहे.
पाकिस्तानच्या वर्षभरापासून कुरापती वाढल्या आहेत. पाकिस्तान सैन्याकडून सीमेवर वारंवार शस्त्रसंधीच्या उल्लंघन होत आहे, त्यामुळे सीमेवर तणावाचे वातावरण आहे, आणि पाकिस्तानच्या याच कुरापतीमुळे सीमा सुरक्षादलाने यंदा पाकिस्तानी रेन्जर्सनां मिठाई दिली नाही.
मात्र दुसरीकडे भारतीय सैन्याने बांग्लादेशमधील सुरक्षादलाच्या जवानांना प्रजासत्ताक दिनानिमित्ताने मिठाई दिली आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील संबध हे शत्रुत्त्वाचे असले, तरी महत्त्वाच्या दिवशी दोन्ही देशांतील सुरक्षा दल मिठाईची देवाणघेवाण करतात. पण, जर सीमेवर तणावाचे वातावरण असेल तर मात्र या परंपरेत खंड पडतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)