भारत-पाकिस्तान लढतीला इम्रान खान यांची उपस्थिती

पाक पंतप्रधान अमिरातीच्या दौऱ्यावर

कराची: भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये आशिया चषख क्रिकेट स्पर्धेतील साखळी सामना आज (बुधवार) रंगणार आहे. या लढतीसाठी पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान व माजी क्रिकेट कर्णधार इम्रान खान उपस्थित राहणार असल्याचे वृत्त पाक माध्यमांनी दिले आहे.

-Ads-

जिओ टेलिव्हिजनने दिलेल्या वृत्तानुसार इम्रान खान हे पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्या परदेश दौऱ्यावर जाणार असून हा दौरा सौदी अरेबिया आणि संयुक्‍त अरब अमिराती या देशांचा आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात ते अमिरातीच्या दौऱ्यावर असून दुबई येथे उद्या रंगणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याला हजर राहणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

इम्रान खान हे पाकिस्तानच्या सर्वाधिक यशस्वी कर्णधारांपैकी एक असून त्यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने 1992 विश्‍वचषक स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर राजकारणात प्रवेश करून इम्रान खान यांनी तेहरीक-ए-इन्साफ हा राजकीय पक्ष स्थापन करून निवडणूक लढविली व पाकिस्तानचे पंतप्रधान बनले. इम्रान खान हे पाकिस्तान क्रिकेट नियामक मंडळाचे पदसिद्ध आश्रयदातेही आहेत. दरम्यान भारत व पाकिस्तान हे दोन संघ संयुक्‍त अरब अमिरातीत 2006 नंतर पहिल्यांदाच एकमेकांसमोर येत आहेत. त्यामुळे या सामन्याला इम्रान खान यांची उपस्थिती लक्षणीय मानली जात आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)