भारत आणि पाकिस्तानचे संबंध ताणले जात असतानाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. भारत-पाक दोन्ही देशांनी रशियातील युद्धाभ्यासात सहभाग घेतला होता. या युद्धाभ्यासानंतर भारत आणि पाकिस्तानच्या जवानांनी एकत्र बॉलिवूड गाण्यावर डान्स केला.

एससीओ (शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन) च्या दहशतशतवाद विरोधातील  युद्धाभ्यासात भारत-पाकिस्तानने पहिल्यांदाच एकत्र भाग घेतला. हा युद्धाभ्यास 22 ते 29 ऑगस्टपर्यंत रशियात करण्यात आला. यामध्ये रशिया, चीन, किरगीझ प्रजासत्ताक, कझाखस्तान, ताजिकीस्तान आणि उझबेकीस्तान आदी देशांनीही सहभाग घेतला होता. हा युद्धाभ्यास पूर्ण झाल्यानंतर भारत-पाक सैनिकांनी एकत्र बॉलीवूड आणि पंजाबी गाण्यावर थिरकले. यावेळी अन्य देशांनीही डान्स केला. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडिओत दोन्ही देशाचे सैनिक मस्ती करताना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)