भारत देश जगात तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने- मुख्यमंत्री

जोधपूर: जगातील सहाव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेला आपला देश येत्या काही वर्षांमध्ये तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वेगाने कूच करतो आहे. अशावेळी त्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांमध्येनोकरी मागण्याऐवजी उद्योग-व्यवसाय उभारुन रोजगार देऊ  शकणारा माहेश्वरी समाज महत्त्वाचा हातभार लावू शकतो. त्यादृष्टीने अधिवेशनात आयोजित ग्लोबल एक्स्पोचा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेलअसेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

राजस्थानातील जोधपूर येथील पोलो मैदानावर दि. 4 ते 7 जानेवारी 2019 या कालावधीत माहेश्वरी महाकुंभ हे माहेश्वरी समाजाचे आंतरराष्ट्रीय महाअधिवेशन व ग्लोबल एक्स्पो  होत आहे. आज या अधिवेशनात प्रमुख उपस्थित म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपल्या समाजापलीकडे जाऊन अन्य समुदायांसह राष्ट्रासाठी सातत्याने योगदान देणारा समाज म्हणून माहेश्वरी समाजाची ओळख आहे. विश्वगुरु होण्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी या समाजातील नवउद्योजक युवकांनी हातभार लावावा, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी आज जोधपूर येथे केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)