भारत-चीन सीमेवर तैनात जवानांबद्दल चीनकडून धोरणात्मक बदल

बीजिंग चीनने भारताला लागून असलेल्या सीमेवर तैनात जवानांबद्दल मोठा धोरणात्मक बदल केला. चीनने प्रंटियर ट्रूप्सवरील नागरी नियंत्रण पूर्णपणे संपुष्टात आणत त्यांना थेटपणे सैन्याच्या नियंत्रणाखाली आणले असल्याचे सांगण्यात येत आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाने देशाच्या सशस्त्र दलांवर सत्तारुढ पक्षाचा प्रभाव वाढवण्यासाठी पीपल्स आर्म्ड पोलिसांकडूनअसैन्य संस्थांतर्गत काम करणाऱया प्रंटियर डिफेन्स ट्रूप्सचे नियंत्रण पूर्णपणे काढून घेण्याची घोषणा केली.

सीमा विशेषकरून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात सर्व तुकड्यांवर पीएलएचे थेट नियंत्रण राहिल असे चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे. पीएलए चीनच्या केंद्रीय सैन्य आयोगांतर्गत काम करते. तर आयोगाची धुरा क्षी जिनपिंग यांच्या हाती आहे. अलिकडेच जिनपिंग यांना अध्यक्षपदाच्या दुसऱया कार्यकाळासाठी निवडण्यात आले आहे. जिनपिंग यांना माओत्से तुंग यांच्यानंतरचे चीनमधील सर्वात शक्तिशाली नेते मानले जात आहे.

नागरी तुकड्यांचे नियंत्रण अगोदर पीपल्स आर्म्ड पोलिसांकडे होते. या तुकडीची देखरेख आता चीनचे सैन्य करणार आहे. चिनी सैन्याच्या अधिकृत ‘व्हीचॅट’ खात्यावर याची माहिती देण्यात आली. मागील वर्षी डिसेंबरमध्ये सीपीसीने पूर्ण देशात पीएपीवरील नियंत्रण हटविले हेते. इतकेच नाही तर अलिकडेच चीनच्या तटरक्षक दलाला देखील केंद्रीय सैन्य आयोगाच्या नियंत्रणाखाली आणले गेले आहे. अगोदर तटरक्षक दल सागरी प्रशासनाच्या नियंत्रणाखाली होते. चीनच्या तटरक्षक दलाच्या नौका अनेकदा पूर्व चीन समुद्रातील वादग्रस्त क्षेत्रात दिसून येतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)