भारत-चीन संबंध : सुषमा स्वराज यांच्या दौऱ्याकडे लक्ष

नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यात ताणलेले संबंध पाहता परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या चीन दौऱ्यातून मोठी फलनिष्पत्ती होण्याची शक्यता आहे.

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज शनिवारपासून चार दिवसीय चीनच्या दौऱ्यासाठी रवाना झाल्या. भारत आणि चीनचे संबंध जरा नाजूक असले तरी देखील जागतिक स्तरावर चीन आणि भारत एकमेकांचे संबंध चांगले ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असतो. त्यात आता स्वराज यांच्या दौऱ्यात काय घडामोडी घडतात, हे पाहणे महत्वाचे आहे. दरम्यान, शांघाई सहयोग संघटना यांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत भाग घेण्यासाठी स्वराज गेल्या आहेत. या बैठकीत सुषमा स्वराज इतर देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद साधणार असून चीनसोबत वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)