भारत-चीन लष्करी कवायती पुन्हा होणार सुरू

नवी दिल्ली – भारत आणि चीन या शेजारी देशांमधील संयुक्त लष्करी कवायत चालू वर्षी पुन्हा सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. दोन्ही देशांच्या लष्करांमध्ये उद्भवलेल्या डोकलाम पेचामुळे या वार्षिक कवायती स्थगित करण्यात आल्या होत्या.

भारताच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन आणि चीनचे संरक्षणमंत्री वेई फेंघे यांच्यात मंगळवारी बीजिंगमध्ये चर्चा झाली. त्या चर्चेत वार्षिक लष्करी कवायती पुन्हा सुरू करण्याचा मुद्दा उपस्थित झाला. दोन्ही देशांमध्ये सहमती झाल्याने पुढील चार ते पाच महिन्यांत संयुक्त लष्करी कवायत होईल. त्याबाबतची घोषणा लवकरच केली जाईल, अशी माहिती सरकारी सुत्रांनी आज पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. दोन्ही देशांच्या लष्करांमधील विश्‍वास वाढीस लावणारे पाऊल म्हणून संयुक्त कवायतींकडे पाहिले जात आहे. त्यामुळे या कवायती पुन्हा सुरू व्हाव्यात, अशी दोन्ही देशांची इच्छा आहे.

मागील वर्षी चीनमध्ये संयुक्त लष्करी कवायत होणार होती. मात्र, दोन्ही देशांच्या लष्करांमध्ये 73 दिवसांचा डोकलाम पेच उद्भवला. त्यामुळे स्थगित करण्यात आलेली कवायत आता चीनमध्ये होईल, असेही सुत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
3 :heart:
0 :joy:
5 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)