भारत-चीन यांनी मैत्रीपूर्ण संबंधांच्या वाढीवर भर द्यावा : स्वराज

बीजिंग : भारत आणि चीन हे आशिया खंडातील दोन सर्वात मोठे देश आहेत. दोन्ही देशांचा विकास देखील अत्यंत गतीने होत आहे. त्यामुळे आशिया खंडाच्या विकासाची जबाबदारी देखील या दोन देशांवरच आहे. म्हणून चीन आणि भारत यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांच्या वाढीवर दोन्ही देशांनी भर दिला पाहिजे, असे मत भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी व्यक्त केले.

चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या. भारत-चीनने परस्परांमधील मतभेद बाजूला ठेऊन यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे स्वराज यांनी म्हटले. याच बरोबर या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या २७ आणि २८ एप्रिला चीन दौऱ्यावर येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

जगामध्ये होत असलेल्या वैश्विक बदलांच्या पार्श्वभूमीवर भारत आणि चीन यांच्यातील संबंध चांगले राहणे हे सर्वांच्याच हिताचे आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या सीमावर सुरु असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमधून मार्ग काढणे हे दोन्ही देशांचे आद्यकर्तव्य आहे. असे मतही स्वराज यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)