‘भारत’ चित्रपटातील अटारी-वाघा बॉर्डरचा फोटो पाहिलात का ?

बॉलिवूडमध्ये भव्य सेट बनवण्याची परंपरा तशी जुनीच आहे. सलमान खानच्या आगामी चित्रपट ‘भारत’साठीही भव्य-दिव्य सेट बनविण्यात आला आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी चक्क अटारी-वाघा बॉर्डरच नव्याने बनविण्यात आली आहे. अटारी-वाघा बॉर्डरच्या सेटचा एक फोटो सलमान खानने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा फोटो पाहून ही  बॉर्डर खरी असल्याचा भास होतो. या फोटोमध्ये सलमान खान आणि कतरीना कैफ उभे असलेले दिसत आहेत.

-Ads-

अमृतसरमधील भारत-पाकिस्तानची सीमा अटारी-वाघा बॉर्डर जगात प्रसिद्ध आहे. भारत चित्रपटासाठीही पंजाबमधील लुधियानापासून २० किमी अंतरावरील बल्लोवाल गावात अटारी-वाघा बॉर्डरचा सेट उभारण्यात आला आहे.

अली अब्बास जफर यांच्या दिग्दर्शित “भारत’ चित्रपट हा “ओड टू माय फादर’ या कोरियन चित्रपटाचा रीमेक आहे. या चित्रपटात सलमान आणि कतरीना ही जोडी पाच वेगवेगळ्या लुकमध्ये दिसणार आहेत. यात दोघांना तरुणपणापासून वयोवृद्धचा जीवन प्रवास दाखविण्यात आला आहे. सलमान-कतरीना यांच्याशिवाय “भारत’मध्ये तब्बू, दिशा पाटनी, जॅकी श्रॉफ आणि सुनील ग्रोवर आदी कलाकार झळकणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)