“भारत की बात’ मध्ये दिसणार “सह्याद्री देवराई’ प्रकल्प

धामणी येथे चित्रीकरण करताना टिम. (अमोल खाडे)

 

पळशी, दि. 14(वार्ताहर) – अभिनेते सयाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गेले तीन वर्षांपासून “सह्याद्री देवराई’ या महत्त्वकांक्षी प्रकल्पातंर्गत महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी तर माण तालुक्‍यातील विविध ठिकाणी झाडांची लागवड करण्यात आली. या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी “न्युज 18′ या हिंदी चॅनेलने भेट दिली. यामध्ये दिवडी, पिंगळी व धामणी या ठिकाणी सह्याद्री देवराईला भेट देऊन स्थानिक गावकऱ्यांच्या भेटी घेऊन येणाऱ्या अडचणी व झाड जगवण्यासाठी केलेल्या उपाययोजना, झाडाचे महत्त्व जाणून घेतले. तसेच देवराई प्रकल्पाबाबत प्रोत्साहीत केले. यावेळी उपस्थित देवराईचे समन्वयक योगेश गायकवाड, संतोष काटकर, माजी सरपंच मारुती पाटील, सतीशकुमार माळवे, रवींद्र जाधव, चंद्रकांत नाकडे, ज्योतिबा पुजारी, दादा जाधव, पांडुरंग जाधव, सुधाकर नाकाडे, निलेश खाडे, सुशांत नाकाडे, चैतन्य खाडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. प्रॉडक्‍शन एपिसोड डायरेक्‍ट राव देवेंद्रसिंह यांच्यासह टीम उपस्थित होती. “भारत की बात’ या कार्यक्रमातून माण तालुक्‍यातील आदर्शवत प्रकल्पाची माहिती देशभर होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)