भारत-ऑस्ट्रेलिया सराव सामना : पहिल्या दिवसाचा खेळ पाण्यात 

सिडनी : सिडनी येथे काल झालेल्या अवकाळी पावसामुळे भारत विरुद्ध क्रिकेट ऑस्टेलिया ११ यांच्या दरम्यानचा सराव कसोटी सामना सुरु होऊ शकला नाही. भारत सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून येत्या ६ डिसेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. दरम्यान या कसोटी मालिकेच्या आधी भारतीय संघ कालपासून क्रिकेट ऑस्टेलिया ११ संघाविरुद्ध सराव सामना खेळणार होता मात्र सिडनी येथे मंगळवारी रात्री पासूनच अवकाळी पावसाने जोर धरल्याने सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करावा लागला.

काल बुधवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी १ वाजता पावसाने विश्रांती घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांनी  मैदान सुकवण्यासाठी अथक प्रयत्न केले. पंचांनी देखील मैदानाची पाहणी करून दुपारी ३.३० वाजता नाणेफेक व ४ वाजता पहिल्या दिवसाचा खेळ सुरु होईल असे जाहीर केले. मात्र त्यानंतर पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावल्याने पंचानी पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करीत असल्याचे जाहीर केले. दरम्यान हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज (गुरुवारी) देखील पाऊस पडण्याची ५०% शक्यता आहे. शुक्रवारी व शनिवारी मात्र पाऊस पडण्याची शक्यता नसल्याचा अंदाज देखील  नसल्याचे हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. हवामान खात्याचा हा अंदाज बरोबर ठरल्यास भारताला अडेलैड येथे होणाऱ्या पहिल्या कसोटीच्या आधी २ दिवसांहून अधिक वेळ सराव करायला मिळणार आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)