भारत एके दिवशी कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली गाडला जाईल

सर्वोच्च न्यायालयाने फटकारले : घनकचरा व्यवस्थापन करण्याचे दिले आदेश
नवी दिल्ली – देशभरात स्वच्छतेशी निगडीत घनकचरा व्यवस्थापनाच्या नियमांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्यात येत नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर जोरदार ताशेरे ओढले आहे. “भारत एके दिवशी कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली गाडला जाईल, अशा शब्दांत न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्‍त केली आहे.

न्यायमूर्ती मदन बी. लोकूर आणि दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने कचरा प्रश्‍नावर नाराजी व्यक्त केली. आम्ही आदेश देतो, पण घनकचरा व्यवस्थापन नियम योग्य पद्धतीने लागू केले जात नाही. मग आदेश देण्याचा फायदा काय? आदेश लागू करण्याबाबत कुणीही फारसे गंभीर असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे असाच प्रकार पुढे सुरू राहिल्यास एके दिवशी कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली संर्पूण देशच गाडला जाईल, असे मत त्यांनी व्यक्‍त केले.

ऍड. कॉलिन गोन्साल्वेस म्हणाले की, न्यायालयाने देशभरातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना 3-4 महिन्यांत ठोस कचरा व्यवस्थापन नियमांचे अंमलबजावणी करायला सांगितले पाहिजे. आणि जर ते तसे करण्यास असमर्थ असतील तर तो कायद्याचा अपमान आहे. घनकचरा व्यवस्थापन नियम खूप विस्तृत आणि सर्वसमावेशक आहे आणि दिल्लीने यापूर्वीच त्याची अंमलबजावणी केली आहे, असा युक्‍तीवाद त्यांनी केला.

सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी तीन महिन्यात एक नीति तयार करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे. सध्या न्यायालयात घनकचरा व्यवस्थापन नियम लागू करण्याविषयी याचिकेवर सुनावणी सुरु आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)