भारत-इंग्लंड पहिल्या कसोटीमधील निर्णायक दिवसाची सुरुवात

भारताला विजयासाठी हव्या आहेत ८४ धावा-

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटो मालिकेतील पहिली कसोटी निर्णायक टप्प्यावर आली आहे. कसोटीच्या तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला त्यावेळी भारताचा धावफलक ११०/५ असा आहे. विजयासाठी भारताला आणखी ८४ धावांची गरज आहे. तर इंग्लंडचे गोलंदाज फक्त ५ उत्तम चेंडूवर सामन्याचा निकाल लावू शकतात.

-Ads-

कसोटीच्या दुसऱ्या दिवशी विराटने जबरदस्त शतकी खेळी केली होती. तिसर्या दिवशी पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व राहिले. इंग्लडच्या सर्व खांद्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी परतीचा रस्ता दाखवला परंतु इंग्लंडच्या फलंदाजीचे शेपूट गुंडाळण्यात भारतीय गोलंदाजांना अपयश आहे. सॅम करन आणि राशीदने कडवा प्रतिकार केला आणि त्यांचा डाव १८० धावांवर आटोपाण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले.

भारतीय जलदगती गोलंदाजांनी जो करिष्मा करून दाखवला तो इंग्लिश गोलंदाज देखील करताहेत. त्यांनी देखील स्विंग गोलंदाजीची उत्तम प्रदर्शन करताना वरच्या फळीतील भारतीय फलंदाजांना बाद केले आहे.

भारताचा संकटमोचक कर्णधार विराट कोहली पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावात देखील ठिय्या मांडून आहे आणि त्याने ४३ धावा केल्या आहेत. त्याला दिनेश कार्तिक १८ धावांवर खेळत उत्तम साथ देत आहे. चाहते कार्तिककडून आशिया स्पर्धेत केलेल्या विजयी खेळाप्रमाणे खेळी करावी म्हणून अशा लावून बसले आहेत.

गोलंदाजांनी गाजवलेल्या तिसऱ्या दिवसानंतर आजचा खेळ जेव्हा चालू होईल तेव्हा पहिल्या कसोटी सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्व क्रीडाप्रेमींचे लक्ष लागून आहे. विराट कोहली धावांचा पाठलाग करताना पुन्हा करिष्मा करतो का हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)