भारत-इंग्लंड कसोटीला कर्जबुडव्या मल्ल्याची हजेरी

लंडन – भारतीय बॅंकांचे कोटयवधी रूपयांचे कर्ज बुडवून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या लंडनच्या ओव्हल मैदानावर भारत-इंग्लंड कसोटी सामना पाहण्यासाठी आला होता. विजय मल्ल्याचा मैदानावरील हा व्हिडीओ एका वृत्तसंस्थेने शेअर केला आहे. या व्हिडीओत मल्ल्याची मुजोरी दिसून येत आहे.

एएनआयच्या प्रतिनिधीने मल्ल्याला प्रश्नही विचारला की, भारतात कधी परतणार? याचा निर्णय न्यायाधीश घेतील, असे उत्तर मल्ल्याने प्रतिनिधीला दिले. भारताकडून विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र तो अद्याप इंग्लंडमध्येच आहे.

विजय मल्ल्याचे क्रिकेटप्रेम यापूर्वीही अनेकवेळा दिसून आले आहे. याआधी 2016मध्ये मल्ल्या ओव्हलच्या याच मैदानात चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारत-दक्षिण आफ्रिकेचा सामना पाहण्यासाठी आला होता. त्यावेळी मैदानात प्रेक्षकांनी मल्ल्याविरोधात “चोर चोर..’ अशी घोषणाबाजी केली होती.

विजय मल्ल्यावर भारतीय बॅंकाचे 9 हजार कोटी रुपये बुडवल्याचा आणि मनी लॉंन्ड्रीगचा आरोप आहे. भारताकडून मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी इंग्लंडच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयात सुनावणी सुरू आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)