भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान आजपासून दुसरी कसोटी 

हैदराबाद: भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान सुरु असलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना आज पासून हैदराबाद येथे सुरु होणार असुन पहिला कसोटी सामना जिंकून भारताने आधीच मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून वेस्ट इंडीजला हा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडविण्याची संधी असणार आहे तर सामन्यासह मालिका जिंकत भारत कसोटी क्रमवारीतील आपले अव्वल स्थान राखण्यासाठी विशेष प्रयत्नशील असणार आहे.
दरम्यान, वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि 272 धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. त्यामुळे मालिकेत भारत 1-0ने आघाडीवर आहे. भारताने पहिला कसोटी सामना केवळ तीन दिवसांत संपवला होता. त्यातही सुमारे दीड दिवस भारताने एक डाव फलंदाजी केली. उर्वरित कालावधीत उर्वरीत दिड दिवसात भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडीजच्या संघाचे दोन डाव संपुष्टात आणले होते. सामन्यात भारताने पहिला डाव 649 धावा करून घोषित केला होता. मात्र, दोन डाव फलंदाजी करुनही विंडीजच्या संघाला तितकी धावसंख्या उभारता आली नव्हती. त्यामुळे या सामन्यातही भारतीय संघ त्याच प्रमाणे विंडीजच्या संघावर वर्चस्व गाजवतो का ते पहाणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.
यापुर्वी 2011 आणि 2013 सालच्या दौऱ्यातही भारतीय संघाने वेस्ट इंडीजवर 2-0 असा विजय मिळवत त्यांना कसोटी मालिकेत व्हाईटवॉश दिला होता. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने चांगली फलंदाजी करताना सामन्यात तीन शतक लगावले होते. तर दोन खेळाडूंनी आपापली अर्धशतके पूर्न केली होती ज्यात युवा यष्टीरक्षक ऋषभ पंत आणि अनुभवी फलंदाज चेतेश्‍वर पूजारायांचा समावेश आहे. मात्र, भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्‍य रहाणे गेल्या काही काळा पासून सातत्याने अपयशी ठरत असल्याने त्याच्या फॉर्म विषयी चिंता व्यक्त केली जात असून आगामी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेपूर्वी फॉर्म मध्ये येण्याची त्याच्या कदे ही शेवटची संधी आहे. त्याच बरोबर सलामीवीर लोकेश राहुलयाच्या फॉर्म विषयी देखिल चिंता व्यक्त केली जात आहे. तरीही त्याला अखेरच्या कसोटी सामन्यासाठी संघात सामील करुन घेतले जाणार असून त्याला भविष्यातील गुंतवणूक म्हणुन पाहिले जात आहे.
त्यातच वेस्ट इंडीज संघाकडून कायरन पॉवेल (83) आणि रोस्टोन चेस (53) यांनीच थोडीफार चांगली कामगिरी करताना आपली दखल घ्यायला लावली, मात्र संघातील इतर फलंदाजांना यावेळी अपयश आल्याने दुसऱ्या कसोटी सामन्यातही भारतीय संघ वर्चस्व गाजवेल अशी शक्‍यता निर्माण झाली आहे.
प्रतिस्पर्धी संघ – 
भारतीय संघः विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्‍य रहाणे, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, आर.अश्‍विन, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव आणि शार्दुल ठाकूर.
वेस्ट इंडीज संघ – जेसन होल्डर (कर्णधार), सुनील अंबरीस, देवेंद्र बिशू, क्रेग ब्रेथवेट, रोस्टॉन चेस, शेन डाऊरिच, शेनॉन गॅब्रिएल, जहमार हॅमिल्टन, शिमरॉन हेथमायर, शाई होप, अल्झारी जोसेफ, किमो पॉल, कायरन पॉवेल, केमार रोच, जोमेल वॅरिकन.
सामन्याची वेळ – सकाळी 9.30 वाजता. 
स्थळ – हैदराबाद. 

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)