भारत आणि रशियामधील एस-४०० हवाईरक्षा करारावर हस्ताक्षराची मोहोर 

नवी दिल्ली – भारत आणि रशियामधील बहुप्रतीक्षित एस-४०० हवाई रक्षा प्रणाली करारावर हस्ताक्षर करण्यात आले आहेत. या करारानुसार भारत रशियाकडून एस-४०० हवाई रक्षा प्रणालीचे ५ सेट विकत घेणार आहेत.

वार्षिक द्विपक्षीय शिखर बैठकीसाठी भारतात आलेले रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या करारावर आज हस्ताक्षर केले. याव्यतिरिक्त अंतराळ आणि ऊर्जासंबंधी महत्वपूर्ण क्षेत्रात रशिया आणि भारतामध्ये करार होण्याची शक्यता आहे. या कराराची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल.

-Ads-

दरम्यान, भारत आणि रशियामध्ये होणाऱ्या चर्चेवर संपूर्ण जगाच्या नजरा खिळल्या आहेत. अमेरिकेनेही याआधी एस-४०० क्षेपणास्त्र करारावरून भारताला चेतावणी दिली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)