भारत आणि पाकिस्तान दरम्यान विधायक मध्यस्थीची चीनची ईच्छा

बीजिंग – भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे संबंध सुरळीत व्हावेत यासाठी सकारात्मक आणि विधायक मध्यस्थी करण्याची तयारी चीनने दर्शवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे नवीन पंतप्रधान इम्रान खान यांनी द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या दृष्टीने केलेल्या सकारात्मक वक्‍तव्यांचेही चीनने स्वागत केले आहे.

भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सुधारणे आणि संबंधांमध्ये प्रगती होणे हे प्रादेशिक शांतता, स्थिरता आणि समृद्धतेच्या दृष्टीने महत्वाचे आहे, असे चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्‍ते लु कांग यांनी म्हटले आहे. मोदी आणि इम्रान खान यांच्यातील सकारात्मक वक्‍तव्याबाबत प्रतिक्रिया व्यक्‍त करताना ते बोलत होते.

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश दक्षिण आशियातील महत्वाचे देश आहेत. या दोन्ही देशांचा सामायिक शेजारी म्हणून चीन दोघांनाही पाठिंबा आहे. परस्परांमधील विश्‍वासात वाढ, मालमत्तांची हाताळणी आणि परस्परांमधील विवाद सोडवण्यासाठीही परस्परांमधील संवादात वाढ व्हायला हवी, असे लु म्हणाले असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.

प्रादेशिक शांतता आणि विकासासाठी दोन्ही देश संयुक्‍तपणे कटिबद्ध राहतील, अशी अपेक्षा व्यक्‍त करत दोन्ही देशांमध्ये सकारात्मक आणि विधायक मध्यस्थीची तयारीही चीनने दर्शवली आहे. मात्र ही मध्यस्थी कोणत्या स्वरुपात असेल आणि ही मध्यस्थी कोणत्या विषयासंदर्भात आणि कधी केली जाईल याबाबत कोणताही अंदाज केला जाऊ शकणार नाही. मात्र दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी कोणतीही जबाबदारी सकारात्मकतेने पार पाडली जाईल, असेही लु म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)