भारत आणि चीनमधील संयुक्त गट ही महत्वाची संवाद यंत्रणा

वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांचे प्रतिपादन 

नवी दिल्ली – आर्थिक संबंध, व्यापार, विज्ञान व तंत्रज्ञान यावरील भारत-चीन संयुक्त गटाची 11 वी बैठक आज नवी दिल्लीत वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू व चीनचे वाणिज्य मंत्री झॉंग शान यांच्या अध्यक्षतेखाली झाली. भारत आणि चीनमधील संयुक्त गट ही दोन्ही देशांमधली सर्वात जुनी आणि अत्यंत महत्त्वाची संवाद यंत्रणा असल्याचे प्रभू यांनी यावेळी सांगितले.

दोन्ही देशांमधल्या व्यापार असंतुलनाच्या महत्वाच्या समस्येवर या बैठकीत चर्चा झाली. सोयाबीन, बासमती व इतर तांदूळ, फळे, भाज्या, साखर यासारख्या कृषी उत्पादनांना अधिक व्यापक बाजारपेठ मिळण्याबाबत प्रभू यांनी भर दिला. तसेच उच्च गुणवत्तेची वैद्यकीय उत्पादने भारतातून निर्यात करायला चीनला वाव असल्याचे सांगितले. माहिती तंत्रज्ञान आणि त्यावर आधारित सेवांची चीनला निर्यात, पर्यटन आणि आरोग्यनिगा क्षेत्रातील सहकार्यावर लक्ष्य केंद्रित करण्याची गरज प्रभू यांनी व्यक्त केली.

चीनमधल्या भारतीय गुंतवणुकीचे झॉंग शॉन यांनी स्वागत केले आणि व्यापार असंतुलनाच्या समस्येवर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)