भारत आणि अमेरिका व्यापारातील अडचणींवर करणार चर्चा

वॉशिंग्टन – भारत आणि अमेरिका यांच्यात सध्या व्यापारातील काही बाबींवर मोठेच मतभेद निर्माण झाले आहेत. अमेरिकेहून आयात केल्या जाणाऱ्या मालावर भारताने मोठ्या प्रमाणात कर लागू केल्याने खुद्द अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक वेळा आगपाखड केली आहे. या पार्श्‍वभूमीवर या दोन्ही देशांनी अधिकारी पातळीवर चर्चा करून व्यापाराच्या क्षेत्रातील अडचणी दूर करण्याचे ठरवले आहे. भारताचे वाणिज्य आणि व्यापार मंत्री सुरेश प्रभु सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत.

त्यांनी अमेरिकेचे वाणिज्यमंत्री विबर रॉस आणि अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी रॉबर्ट लाईथीझर यांच्याशी चर्चेच्या अनेक फेऱ्या केल्या. त्यावेळी दोन्ही देशांमध्ये व्यापार करांमध्ये जी तफावत आहे त्यावर तोडगा काढण्यासाठी अधिकारी पातळीवर चर्चेची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.प्रभु यांनी पत्रकारांना सांगितले की आम्ही आता या विषयावर एकत्र काम करण्याचे ठरवले आहे. या चर्चेसाठी भारतातर्फे एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ अमेरिकेला पाठवले जाणार असून येत्या काहीं दिवसांतच ते अमेरिकेत दाखल होईल असे ते म्हणाले.

-Ads-

भारताने काही अमेरिकन मालावर शंभर टक्के आयात कर लागू केला आहे तो त्यांनी मागे घेतला नाही तर आम्हीही भारतीय मालाच्या बाबतीत तशीच कृती करू असा जाहीर इशारा ट्रम्प यांनी जी 7 परिषदेच्यावेळी दिला होता. या पार्श्‍वभूमीवर अमेरिकन अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी सुरेश प्रभु अमेरिकेत दोन दिवसांच्या भेटीवर दाखल झाले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)