भाजप सरचिटणीस राम माधव यांचे प्रतिपादन

वॉशिंग्टन – भारताचे रशिया आणि चीनशी जे संबंध आहेत त्याचा भारत-अमेरिका संबंधांवर काहीही विपरीत परिणाम होणार नाही. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध हे अन्य दोन देशांवरील संबंधावर अवलबूंन नाहीत असे प्रतिपादन भाजपचे सरचिटणीस राम माधव यंनी केले आहे. रशिया आणि चीन बरोबर संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न भारताकडून होत असले तरी अमेरीकेशी असलेले संबंध आम्ही आधिक दृढ करण्याच्या प्रयत्नांत आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.

आज येथे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली. अमेरिकेकडून रशियावर निर्बंध लागू केले जात आहेत त्या पार्श्‍वभूमीवर बोलताना माधव म्हणाले की प्रादेशिक गरज म्हणून भारत आज रशियाशी संबंध ठेऊन आहे. कारण त्या प्रदेशात रशिया ही एक मोठी शक्ती आहे. पण त्याचा आम्ही अमेरिकेशी असलेल्या संबंधांवर विपरीत परिणाम होऊ देणार नाहीं. ते म्हणाले की गेल्या तीन चार वर्षांपासून भारत एक वेगळीच विदेश निती अवलंबत आहे.

प्रत्येक देशाबरोबर स्वतंत्रपणे संबंध प्रस्थापित करणे आणि त्या संबंधांचा अन्य देशांशी असलेल्यासंबंधावर विपरीत परिणाम होऊ न देणे ही आमची भूमिका आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. एनडीए सरकारचा चौथा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी अमेरिकेतील भाजप मित्र संघटनेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी ते येथे आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)