भारती विद्यापीठात नोकरीच्या आमिषाने दोघांची फसवणूक

पुणे- भारती विद्यापीठात नोकरी लावण्याच्या आमिषाने दोघांची 65 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत स्वारगेट पोलीस ठाण्यात एकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अशोक अंडील (26, रा. परभणी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार किशोर बस्तवडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर बस्तवडे याने नोकरी लावण्याच्या बहाण्याने फिर्यादींकडून 30 हजार आणि केशव सुदाम अंडील यांच्याकडून 35 हजार रुपये घेतले. त्यानंतर नोकरी लावली नाही, तसेच घेतलेले पैसेही परत दिले नाहीत. हा प्रकार 13 ते 25 एप्रिल दरम्यान स्वारगेट जवळील नटराज हॉटेलमध्ये घडला. उपनिरीक्षक प्रकाश मोरे अधिक तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)