भारतीय हवाई दलाचे जेट ओडिशात कोसळले

नवी दिल्ली – भारतीय हवाई दलाचे एक जेट विमान ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यात कोसळल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. वैमानिकांना प्रशिक्षण देणारे हे हॉक विमान पश्‍चिम बंगालमधील कलाईकुंडा हवाई तळावरून उड्डाण केल्यानंतर कोसळले. विमानात एक पायलट आणि एक प्रशिक्षणार्थी पायलट होता. मात्र दोघेही सुखरूप असल्याची माहिती हवाई दलाने एका निवेदनात दिली आहे. साबरमती नदीच्या किनाऱ्यावर हे हॉक विमान कोसळताच त्याने पेट घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

नित्यक्रमानुसार पश्‍चिम बंगालमधील कलाईकुंडा हवाई तळावरून प्रशिक्षणासाठी आकाशात झेप घेताच हे हॉक विमान दुर्घटनाग्रस्त झाले. पायलट आणि प्रशिक्षणार्थी पायलट विमानातून बाहेर पडल्यानंतर विमान साबरमती नदीच्या किनारी कोसळले आणि त्याने पेट घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. ओडिशा आणि झारखंड यांच्या सीमेवरील मयूरभंज जिल्ह्याच्या सारसकना विभागात ही दुर्घटना घडली. मदतीसाठी अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी पोहचले होते.
हॉक हे विमान हिंदुस्थान एरोनॉटिक्‍स लि. बीएई या ब्रिटिश कंपनीच्या परवान्यानुसार निर्माण करते. हवाई दल आणि नौदलाकडे मिळून सुमारे 120 हॉक प्रशिक्षणार्थी विमाने आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)