भारतीय हद्दीत घुसलेल्या निशाणेबाजांवर लष्कराचे लक्ष 

लष्करप्रमुख बिपीन रावत यांचे प्रतिपादन 

नवी दिल्ली  –
संरक्षण दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्यासाठी शेजारच्या देशातून भारतीय हद्दीत काश्‍मीरखोऱ्यात काही निशाणेबाज घुसले असल्याच्या वृत्तावर लष्कराचे लक्ष आहे असे प्रतिपादन लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी केले आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यापासून जैश ए मोहंमदच्या निशाणेबाजांकडून झालेल्या हल्ल्यात लष्कराचे एकूण तीन जण आत्ता पर्यंत शहींद झाले आहेत. अशा प्रकारचे हल्ले रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना आता काही नवीन स्ट्रॅटेजी आखावी लागेल असे त्यांनी म्हटले आहे.

जनरल रावत म्हणाले की या हल्ल्यांचा अभ्यास केला जात असून ते निशाणेबाज दहशतवाद्यांकडून केले गेले आहेत किंवा कसे हे तपासले जात आहे. या निशाणेबाजांकडे विशिष्ट प्रकारची शस्त्रे असतात मात्र तशा स्वरूपाची कोणतीही शस्त्रे आम्हाला अजून तेथे आढळून आलेली नाहीत असेही त्यांनी नमूद केले.तथापी त्यांना अन्य शस्त्रे वापरूनही आपले काम साधता येऊ शकते ही बाबही आमच्या ध्यानात आहे असे त्यांनी स्पष्ट केले. गुप्तचरांनी मध्यंतरी एक अहवाल दिला आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की जैश ए मोहंमद या दहशतवादी संघटनेचे काही गट भारतीय हद्दीत घुसले असून त्यांच्यावर संरक्षण दलातील व्यक्तींना लक्ष्य करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. हे गट दक्षिण काश्‍मीर मधील पुलवामा मध्ये कार्यरत आहेत त्यांना तेथील काही स्थानिक समर्थकांची मदत मिळत आहे असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. काश्‍मीर मध्ये घुसलेल्या संशयित निशाणेबाजांच्या संबंधात लष्कर पुर्ण जागृत असून त्याविषयीच्या घडामोडींवर बारीक नजर ठेवली जात असल्याची माहितीही जनरल रावत यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)