भारतीय हद्दीत घुसलेले चार दहशतवादी बारामुल्ला चकमकीत ठार

श्रीनगर (जम्मू-काश्‍मीर) – सुरक्षा दलांबरोबर बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार भारतीय हद्दीत शिरलेल्या दहशतवाद्यांची माहिती मिळताच लष्कराच्या 32 आरआर, पॅरा कमांडो आणि राज्य पोलीस दलाने विशेष शोध मोहीम चालू केली होती.

एक दिवसापूर्वी भारतीय हद्दीत घुसलेल्या दहशतवाद्यांना रोखण्यासाठी रफियाबादकडे येणाऱ्या सर्व संभावित मार्गांची नाल्यांची नाकेबंदी करण्यात आली होती. सकाळी सुरक्षा दलांनी बीजी टॉप येथे दहशतवाद्यांना घेरले. त्यानंतर झालेल्या चकमकीत चार दहशतवादी मारले गेले. पॅरा कमांडोचा एक जवान गंभीर जखमी झाला असून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

उपचारादरम्यान पॅरा कमांडोचा मृत्यू झाल्याची बातमी आली असली, तरी अधिकृतपणे त्याचा दुजोरा झालेला नाही. दरम्यान चकमकीच्या जागी अतिरिक्त सुरक्षा दले पोहचली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)