भारतीय सीमेवरील हवाई सुरक्षेत चीनने केली वाढ

बीजिंग (चीन) – चीनने भारतीय सीमेवरील हवाई सुरक्षेत वाढ केली आहे, चीनची वेस्टर्न थिएटर कमांड ही मुख्यत: भारतीय पर्वतीय सीमेवरील युद्धासाठी तैनात आहे. चीनची भारताबरोबरची एलएसी (लाईन ऑफ ऍक्‍च्युअल कंट्रोल) 3,488किमी पसरलेली आहे. यामध्ये तिबेटच्या पठाराचाही समावेश आहे.

भारताचा कोणत्याही प्रकारे सामना करण्यासाठी चीन वेस्टर्न थिएटर कमांडमध्ये वृद्धी करत असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. चीनने आपल्या हवाई दलातील जे 10 आणि जे 11 लढाऊ जेट विमानांचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. या बरोबरच चीनने आपल्या स्टील्द फायटर जे-20 तैनात केली आहेत. जे-20 स्टील्द फायटर या भागात प्रथमच तैनात करण्यात आली आहेत.

-Ads-

मागील वर्षी झालेल्या 53 दिवसांच्या सिक्कीम भागातील डोकलाम स्टॅंड ऑफ नंतर चीन आणि भारत आपले संबंध नव्याने प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत. चीनच्या दृष्टीने हवाई हद्दीवरील नियंत्रण अधिक मजबूत करणे हे चीनच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असल्याचे चिनी लष्करी तज्ज्ञ आणि टीव्ही कॉमेंटेटर सॉंग झॉंगपिंग यांनी स्पष्ट केले आहे. भारत फ्रान्सकडून राफेल विमानांची खरेदी करत असल्याचा संदर्भ देत चीनही फायटर जेट्‌सच्या समावेशाने वेस्टर्न थिएटर कमांड अधिक मजबूत करत असल्याचे सॉंग झॉंगपिंग यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)