भारतीय संस्कृती म्हणजे सत्याचे दर्शन –  डॉ. भटकर

पुणे – भारतीय संस्कृती म्हणजे सत्याचे दर्शन व कल्याणमय कृती आहे. हजारो वर्षांचा मानवी संस्कृतीचा इतिहास लिहिला गेला आणि पुढील काळातही लिहिला जाईल. त्यात विश्‍वशांती व मानवतेच्या कार्यासाठी संत ज्ञानेश्‍वर महाराज विश्‍वशांती प्रार्थना सभागृह कलशारोहणाचाही समावेश असेल, असे प्रतिपादन नालंदा विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय भटकर यांनी केले.

एमआयटी विश्‍व शांती विद्यापीठतर्फे लोणी काळभोर येथे विश्‍वशांती आणि मानवतेचे प्रतीक असलेल्या ज्ञानेश्‍वर महाराज विश्‍वशांती प्रार्थना सभागृहाचा कलशारोहण समारंभाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे ते बोलत होते. प.पू. श्रीकृष्ण कर्वे गुरुजी, एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्‍वनाथ कराड, महंत हेमंतपुरी महाराज, महंत डॉ. राघवेश दास वेदांती, हभप तुळशीराम कराड आणि ज्येष्ठ पत्रकार वेद प्रताप वैदिक उपस्थित होते.

-Ads-

या जागतिक स्तरावरील सोहळ्यास हिंदू, मुस्लिम, ख्रिश्‍चन, शीख, बौद्ध, जैन, झोरास्ट्रीयन, ज्यू अशा विविध धर्मातील गाढे अभ्यासक व विद्वान, असे अनुक्रमे पं. वसंत गाडगीळ, शेख बशीर अहमद बियाबानी, अनीस चिस्ती, डॉ. एडिसन सामराज, सरदार राजिंदरसिंग कंडा, भंते नागघोष, हभप बाळासाहेब बडवे, शाहू मोडक यांनी आपापल्या धर्माची प्रार्थना करून शुभाशीर्वाद दिले. यावेळी हभप बापूसाहेब मोरे, विचारवंत फिरोज बख्त अहमद व गोविंद ढोलकिया हे पाहुणे म्हणून उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)