भारतीय संसदेस आदिवासी घालणार घेराव

पिंपळे गुरव – भारतीय संविधानातील पाचव्या अनुसूचीची आदिवासी बहुल भागात सक्‍तीने अंमलबजावणी करण्यात यावी या मुख्य मागणीकरता संसदेच्या एक ते सहा एप्रिलच्या संसदीय अधिवेशन काळात आदिवासी बांधव संसदेस घेराव घालणार आहेत.

महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, मणिपूर, नागालॅंड, तेलंगाणा इत्यादी आदिवासी बहुत राज्यातून दिल्ली येथून संवैधानिक मार्गाने घेराव घालणार आहेत. या आंदोलनात महाराष्ट्रातून किमान पाच लाख आदिवासी बांधव दिल्लीला जाणार असल्याची माहिती नॅशनल जयस (जय आदिवासी युवा संघटन) महाराष्ट्र प्रदेश या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

जयस महाराष्ट्र प्रदेश प्रभारी अमित तडवी यांनी संविधानातील पाचव्या अनुसूचीबद्दल माहिती सांगितली. नंदूरबारच्या सामाजिक कार्यकर्त्या मालती वळवी यांनी मिशन 2018 ची रुपरेषा व प्रमुख मागण्या मांडल्या. यावेळी डॉ. पेढेकर, विनोद माळी, अजय आत्राम, सतिश लेंभे, निलेश पाडवी उपस्थित होते. सूत्रसंचालन आदिम यंगचे जिल्हाध्यक्ष देवराम चपटे यांनी केले. अदिम यंगचे राष्ट्रीय अध्यक्ष आण्णा शेळके यांनी मिशन 2018 द्वारे राजकीय क्रांती घडविण्याचे संकेत दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)