भारतीय संघ बॉक्‍सिंग डे कसोटीत विजयाच्या प्रतिक्षेत

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळवण्यात येणारी तिसरी कसोटी ” बॉक्‍सिंग डे’ कसोटी असून. भारतीय संघ अद्याप ऑस्ट्रेलियात बॉक्‍सिंग डे कसोटीत विजय मिळवू शकला नसल्याने भारतीय संघाला यंदा विजयाची चांगली संधी असेल. नाताळच्या दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या सामन्याला “बॉक्‍सिंग डे’ कसोटी संबोधण्यात येते.

भारताने आतापर्यंत 14 बॉक्‍सिंग डे कसोटी खेळल्या. त्यापैकी केवळ एक सामना जिंकण्यात भारतीय संघाला यश आले आहे. हा सामना द. आफ्रिकेत झाला होता. 14 पैकी 10 सामने भारताने गमावले आहेत. तर, तीन सामने अनिर्णीत राहिले. ऑस्ट्रेलियात भारताने सात बॉक्‍सिंग डे सामने खेळले. त्यातील पाच गमावले तर दोन सामने अनिर्णीत सुटले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ऑस्ट्रेलियात बॉक्‍सिंग डे कसोटीचे आयोजन 1980 पासून मेलबर्न मैदानावर होते. या दरम्यान केवळ एकदा 1989 मध्ये याच दिवशी एकदिवसीय सामना झाला. भारत 1985 पासून बॉक्‍सिंग डे कसोटीत सहभागी होत असून पहिली कसोटी अनिर्णीत राहिली होती. त्याआधी भारताने मेलबोर्नमध्ये पाच सामने खेळले. त्यातील दोन जिंकले तर तीन सामन्यात पराभव झाला. पण या ऐतिहासिक मैदानावर बॉक्‍सिंग डे कसोटी सुरू झाल्यापासून भारताला विजय प्राप्त करता आलेला नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)