भारतीय संघ पराभवाच्या छायेत

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी क्रिकेट मालिका

पर्थ ऑस्ट्रेलियाच्या संघातील तळातील फलंदाजांनी केलेल्या प्रतिकारानंतर त्यांच्या वेगवान आणि फिरकी गोलंदाजांनी केलेल्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांनी टाकलेल्या नांगी मुळे चौथ्या दिवस अखेर भारताची 5 बाद 112 अशी दयनीय अवस्था झाली असून भारतीय संघ विजयापासून अद्याप 175 धावा दुर असल्याने संघ पराभवाच्या छायेत आहे.
दरम्यान चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलिया आपला दुसरा डाव 4 बाद 132 वरुन पुढे सुरु केला. तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाकडे 175 धावांची आघाडी होती. चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाने सावध खेळ करताना आपली आघाडी 233 धावांवर नेली. त्यातच भारताला पहिल्या सत्रात एकही फलंदाजाला बाद करता आले नाही. लंचसाठी खेळ थांबला त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या 4 बाद 190 धावा झाल्या होत्या. त्यात ख्वाजाने झुंजार अर्धशतक नोंदवले होते.
यावेळी भारताच्या दृष्टीने चौथ्या दिवसाचे पहिले सत्र महत्त्वाचे होते. मात्र, पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाने आपले वर्चस्व राखल्यामुळे भारताला मोठ्या आव्हानाचा पाठलाग करावा लागेल की काय अशी परिस्थीती उभा राहिली असताना मोहम्मद शमीने भेदक गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला एका पाठोपाठ दोन धक्के दिले. त्याने कर्णधार पेनला 37 धावांवर बाद केले. त्यानंतर जयाबंदी झाल्याने मैदान सोडलेला फिंच पुन्हा बॅटिंग करण्यास आला. त्यालाही शमीने आल्या पावली माघारी धाडले. त्यामुळे लंचपूर्वी 4 बाद 190 अशा भक्कम स्थिती आलेल्या ऑस्ट्रेलियाची 6 बाद 192 अशी अवस्था झाली होती. यानंतर लागलीच शमीने ख्वाजाचा अडसर दूर करत ऑस्ट्रेलियाला आणखीन एक धक्‍का दिला. ख्वाजा पाठोपाठ कमिन्सही एक धाव करुन परतला. तर, द्वीशतक पार केल्यानंतर शमीने लायनच्या रुपात आपला सहावा बळी टिपला. लायन बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाची 9 बाद 207 अशी अवस्था झाली होती. मात्र, यानंतर आलेल्या हेलवूड (17) आणि स्टार्क (14) या शेवटच्या जोडीने भारतीय गोलंदाजांची धुलाई सुरू केली. त्यांनी अखेरच्या गड्यासाठी 36 धावांची भागिदारी केली. त्यामुळे भारताला 250 पर्यंत टार्गेट मिळेल असा अंदाज असताना या शेवटच्या जोडीने भारतासमोर 286 धावांचे आव्हान उभे केले होते.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 286 धावांचे आव्हान घेऊन फलंदाजीला उतरलेल्या भारताची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात लोकेश राहुल स्टार्कच्या गोलंदाजीवर भोपळाही न फोडता परतला. पाठोपाठ चेतेश्वर पुजारा 4 धावा करुन परतल्याने भारताची 4 षटकांत 2 बाद 13 अशी बिकट अवस्था झाली. या बिकट परिस्थितीत भारताचा कर्णधार विराट कोहली फलंदाजी करण्यास आला. त्याने विजयच्या साथीने भारताचा डाव सावण्यास सुरुवात केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 35 धावांची भागिदारी केली. या दोघांनी ऑस्ट्रेलियाच्या जलदगती गोलंदाजांना चांगले फटके मारले. त्यामुळे हे दोघे भारताचा डाव सवरणार असे वाटत असतानाच नॅथन लायनने विराटला बाद करत भारताला मोठा झटका दिला. त्या पाठोपाठ लायनने मुरली विजयाचा त्रिफळा उडवत भारताची 4 बाद 55 अशी केविलवाणी केली.
यानंतर उपकर्णधार अजिंक्‍य रहाणे आणि हनुमा विहारी यांनी भारताची पडझड थोडावेळ रोखली. या दोघांनी मिळूण पाचव्या विकेटसाठी 43 धावांची भागिदारी केली. दरम्यान, अजिंक्‍य रहाणे 30 धावांवर पोहचलेला अजिंक्‍य आजचा दिवस खेळून काढेल असे वाटत असतानाच त्याने हेजलवूडचा अखूड टप्याचा चेंडू पॉईंटला उभ्या असणाऱ्या हेडच्या हातात मारत आपली विकेट फेकली. यानंतरची षटके पंत आणि हनुमा विहारीने खेळून काढली. दिवस अखेर भारताच्या 41 षटकांत 5 बाद 122 धावा झाल्या. हनुमा विहारी 24 धावांवर तर पंत 9 धावांवर खेळत होते. यावेळी ऑस्ट्रेलिया कडून नॅथन लायनने आणि हेझलवूडने प्रत्येकी 2 गडी बाद केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : 108.3 षटकांत सर्वबाद 326. भारत पहिला डाव षटकांत सर्वबाद 283 (विराट कोहली 123, अजिंक्‍य रहाणे 51, ऋषभ पंत 36, नॅथन लायन 67-5, मिचेल स्टार्क 79-2, जोश हेझलवूड 66-2). ऑस्ट्रेलिया दुसरा डाव 93.2 षटकांत सर्वबाद 243 (उस्मान ख्वाजा 72, ऍरोन फिंच जायबंदी 25, टीम पेन 37, मोहम्मद शमी 56-6, जसप्रीत बुमराह 39-3). भारत दुसरा डाव (हनुमा विहारी नाबाद 24, अजिंक्‍य रहाणे 30, जोश हेझलवूड 24-2, नॅथन लायन 30-2).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)