भारतीय संघ आता दबावात येत नाही – ऍलन बॉर्डर

मेलबर्न: भारतीय संघ सध्याच्या घडीला सर्वोत्तम संघ बनला असून परदेशात अता हा संघ कोणत्याही दबावाशिवाय खेळताना दिसून येतो त्यामुळे हा संघ दबावात येत नाही आणि त्याचा फायदा त्यांना चांगली कामगिरी करण्यात होतो आहे असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी कर्नधार ऍलन बॉर्डरयांनी भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर दिली आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, सध्या भारतीय संघात जागतीक दर्जाचे गोलंदाज आणि फलंदाज आहेत जे आपली जबाबदारी पुर्णपणे ओळखून आहेत आणि त्यानुसार ते आपली कामगिरी पार पाडत आहेत. त्यामुले इतर खेळाडूंवर कोणतेही दडपण येत नाही आणि त्याचा फायदा संघाच्या कामगिरीवर होतो आहे. एक वेळ अशी होती की, भारतीय संघ वेगवान आणि उसळणाऱ्या खेळपट्‌टयांवर अडचणीत सापडायचा मात्र आता हा संघ अश्‍या प्रकारच्या खेळपट्‌टयांवरही आत्मविश्‍वासाने उतरतो आणि चांगली कामगीरी करतो आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
5 :thumbsup:
6 :heart:
1 :joy:
1 :heart_eyes:
2 :blush:
2 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)