भारतीय संघाने जिद्द दाखवली – स्टीफन कॉन्स्टन्टाइन 

इंटरकॉन्टिनेन्टल चषकाचे जेतेपद मिळवणाऱ्या खेळाडूंचे प्रशिक्षक कॉन्स्टन्टाइन यांच्याकडून कौतुक 
मुंबई – आंतरखंडीय चषक फुटबॉल स्पर्धेमध्ये भारतीय संघाने त्यांचे कौशल्य आणि पराभवातूनही उसळून परतण्याच्या त्यांच्या क्षमतेचे दर्शन घडवले आहे. तसेच या स्पर्धेमध्ये भारतीय संघाने सामन्यांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनदेखील अधोरेखित केला असल्याने पुढील वर्षांच्या आशियाई चषकात भारत लिंबूटिंबू संघ म्हणून उतरणार नसल्याचा विश्वास भारतीय संघाचे प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टन्टाइन यांनी व्यक्त केला आहे. भारतीय फुटबॉल संघाने इंटरकॉन्टिनेन्टल कप फुटबॉल स्पर्धेतील विजेतेपद पटकावण्याताना अतिशय जिद्द आणि लवचिकता दाखवली असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्‍त केले. भारताने इंटरकॉन्टिनेन्टल चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात केनयाचा 2-0 असा पराभव केला. त्यानंतर कॉन्स्टन्टाइन म्हणाले की, आशिया चषक स्पर्धेत आमच्यासमोर मोठे आव्हान असेल हे आम्हाला माहीत आहे. आम्ही केवळ संख्या वाढवत नसून तेव्हाच्या आणि आताच्या कालावधीतील योग्य बाबींचा आम्ही अवलंब केला, तर आमच्याजवळ साखळी फेरीतून आशियाई चषकासाठी पात्र ठरण्याची संधी आहे आणि तेच आमचे लक्ष्य आहे.

आशिया चषक स्पर्धा पुढील वर्षी जानेवारीत सुरू होणार असून भारताच्या गटात यूएई, बहारीन आणि थायलंड हे संघ आहेत. इंटरकॉन्टिनेन्टल चषकात केलेल्या कामगिरीने आनंदी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आता पुढील आशियाई चषकाचे आव्हान अधिक मोठे असून त्या दृष्टीने आम्ही विचार करीत आहोत. जर आम्ही सातत्य आणि योग्य ताळमेळ राखू शकलो तर आम्हाला गटातून पात्र होण्याची संधी मिळू शकणार असून तेच आम्ही डोळ्यासमोर ठेवले आहे, असे कॉन्स्टन्टाइन यांनी सांगितले. इंटरकॉन्टिनेन्टल स्पर्धेमुळे आम्हाला आशियाई चषकाची पूर्वतयारी करण्याची संधी मिळाली आहे. आशिया चषकात अंतिम 16 संघांमध्ये तरी आम्ही निश्‍चितपणे धडक मारू शकतो, इतका आत्मविश्वास या स्पर्धेने दिला आहे, असेही त्यांनी नमूद केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सुनील छेत्री, गुरप्रीतसिंग संधूचे कौतुक 
कर्णधार सुनील छेत्री आणि गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू या दोघांची कामगिरी संपूर्ण स्पर्धेत अप्रतिम झाली, असे सांगून कॉन्स्टन्टाइन म्हणाले की, सुनील तर कमालीचा तंदुरुस्त असून त्याच्या कामगिरीने तर आम्ही सगळेच प्रभावित झालो आहेत. आशियाई चषकात तो भारताचे प्रमुख अस्त्र राहणार आहे. फुटबॉलसाठी असलेले त्याचे समर्पण अतुलनीय आहे व त्यामुळेच तो सर्वोत्कृष्ट आहे. त्याचा आदर्श युवा खेळाडूंनी ठेवल्यास भारतीय संघाची वेगाने प्रगती होईल, असेही कॉन्स्टन्टाइन यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)