भारतीय संघाचा दिवस खराब होता- एडल्जी

संघ निवडीचा वाद गौण आहे

नवी दिल्ली: भारताची माजी महिला कर्णधार आणि कार्यकारणी समितीची सदस्य डायना एडल्जी यांनी मिताली राजला इंग्लंड विरुद्धच्या सामन्यातुन वगळण्याच्या मुद्यावर भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरची पाठराखण केली. त्या म्हणाल्या, संघ व्यवस्थापनाने निवडलेल्या अंतिम 11 खेळाडूंच्या निवडीवर वाद होऊ नये. भारतीय महिला संघासाठी तो दिवसच खराब होता.

टी- 20 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात इंग्लंड विरुद्ध अनुभवी मिताली राजला वगळण्यात आले होते आणि हा सामना भारताला गमवावा लागला होता. त्यामुळे भारतीय महिला संघाचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले होते. त्यानंतर भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने मितालीला संघात का घेतले नाही? याचा खुलासा करताना, संघाचे हित डोळ्यांसमोर ठेऊन हा निर्णय घेण्यात आला होता, असे विधान केले होते. त्यामुळे मोठा वाद झाला. मिताली राजने यावर भाष्य केले नाही परंतु तिची व्यववस्थापक अनिशा गुप्ता यांनी या घटनेवर भाष्य करताना हरमनप्रीत कौरला अपात्र कर्णधार म्हटले होते. हा वाद वाढत जात असल्याने यात बीसीसीआयला मध्यस्थी करावी लागत आहे.

पुढे बोलताना एडल्जी म्हणाल्या, संघ व्यवस्थापनामध्ये असलेल्या हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना(उपकर्णधार), रमेश पवार (प्रशिक्षक ) आणि सुधा शाह ( निवड समिती अधिकारी) यांनी मागील सामन्यातील विजयी संघ जशास तसा खेळवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आपण त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थीत करू शकत नाही. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला मितालीच्या गैरहजेरीत पराभूत केले होते. तेव्हा या निर्णयाची चर्चा झाली नाही. जेव्हा भारतीय संघ पराभूत झाला तेव्हाच त्याच्यावर टीका करणे अयोग्य आहे.

भारताच्या पुरुष संघाच्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या विजयाचा दाखला देत त्या पुढे म्हणाला, ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या टी- 20 सामन्यात कृणाल पांड्या खूप महागडा ठरला होता. परंतु, तिसऱ्या सामन्यात त्याने कामगिरीत सुधारणा केली आणि सामनावीर देखील झाला. क्रिकेटमध्य या सर्व गोष्टी होत असतातच. हा खेळाचा एक भाग आहे.

मिताली राज ऑसट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त होती म्हणून तिला त्या सामन्यातून वगळण्यात आले होते. परंतु, इंग्लंड विरुद्धच्या सामन्यापर्यंत ती बरी झाली होती तरी देखील तिला संघात घेतली नाही. या विश्वचषकात खेळल्या दोन्ही सामन्यात तिने अर्धशतके झळकाविली होती. आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात मितालीने 51 धावा केल्या होत्या तर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्धच्या टी- 20 सामन्यात तिने 56 धावांची खेळी केली होती. अनिशा गुप्ता यांनी मिताली राजकारण आणि अवडीच्या खेळाडुंची निवड यांची बळी ठरली असे देखील विधान केले होते. त्यावर चपराक देत एडल्जी म्हणाल्या, असे विधान करण्याची काहीच गरज नव्हती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)