भारतीय संघाचा कर्णधार होणे ही एक संधी

पुण्यात विराट कोहलीने व्यक्‍त केल्या भावना
पुणे : भारतीय संघाचा कर्णधार असणे हॉट सीट आहे….या ठिकाणी प्रेम,लक्ष्य, टीका सगळे काही एका वेळी होत असते, त्यामुळे कसोटी बरोबरच एकदिवसीय सामन्याचा कर्णधार होण्याकडे मी एक संधी म्हणून पाहतो, मात्र त्या सोबत ही एक मोठी जबाबदारी देखील आहे, असे भारताच्या क्रिकेट संघाच्या तिन्ही फॉरमॅटमधील कर्णधार विराट कोहली यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितले.
पुण्यातील एका मॉलच्या उद्धघाटनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विराटने आपल्या भावना व्यक्त केल्या. मंदिरा बेदी हिने विराट कोहली याची मुलाखत घेतली. मला कॅप्टन्सीचा ताण नाही, मात्र मला स्वतःच्या मर्यादा पडताळून पहायला आवडते कारण त्यामुळे आपल्याला आपली क्षमता कळते, आपल्या बरोबर खेळणाऱ्यांच्या चांगल्या गोष्टी जाणून तसेच त्यांच्या कमतरता समजून घेणे आणि संघाला निराशेपासून दूर ठेवण हे कॅप्टनचे काम आहे, असेही विराटने मुलाखतीत सांगितले. हा दिवस माझ्या आयुष्यात येईल असे वाटले नव्हते, मी आणि इशांत शर्मा आम्ही चेंजिंग रुममधले जोकर आहोत, सिनिअर प्लेअर असलेल्या टीमचा कॅप्टन असणे अवघड नाही, असेही मत त्याने व्यक्त केले. 2011 मधील वर्ल्ड कप, मुंबई येथे केलेली डबल सेंचुरी, हे माझ्या आयुष्यातील सगळ्यात ह्रद्यस्पर्शी क्षण आहेत, असेही त्याने नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)