भारतीय विद्यार्थ्यांनी साकारला सर्वांत कमी वजनाचा उपग्रह

चेन्नई : काही महिन्यांपूर्वी पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांनी स्वयंम हा उपग्रह तयार केला होता. आता चेन्नईच्या हिंदुस्तान इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्सच्या एरोस्पेस विभागातील विद्यार्थ्यांनी अवघ्या १५ हजार रुपयांत उपग्रह तयार केला आहे. विशेष म्हणजे हा उपग्रह जगातील सर्वांत स्वस्त असल्याचा दावा केला जात आहे.

चेन्नईच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या उपग्रहाला ‘जय हिंद १ एस’ असे नाव देण्यात आले आहे. याचे वजन फक्त ३३.३९ ग्राम म्हणजे एकाद्या स्मार्टफोन पेक्षाही निम्मेच आहे.नायलॉनची कार्यशीलता तपासणे, हवामानाची माहिती, पावसाचे प्रमाण, रॉकेटच्या प्रक्षेपणाचा मार्ग समजणे,  तापमान याचीही माहिती या उपग्रहाद्वारे समजली जाऊ शकणार आहे, असे या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. एका वेळी हा उपग्रह ६५ ते ७० किमी प्रवास करू शकणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)