भारतीय वंशाच्य कमला हॅरिस यांच्यावर वंशिक शेरेबाजी

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या संसदेतील भारतीय वंशाच्या पहिल्या सिनेटर, डेमोक्रॅटिक पक्षाच्या वरिष्ठ सदस्या आणि 2020 सालच्या अध्यक्षीय निवडणुकीतील संभाव्य उमेदवार कमला हॅरिस यांच्यावर वंशद्वेषी शेरेबाजी केली जायला लागली आहे. “अमेरिकेतील कृष्णवर्णीय नाही.’ अशा आशयाची टीका हॅरिस यांच्यावर इंटरनेटवरून केली जायला लागली आहे.
कमला हॅरिस यांचा जन्म अमेरिकेतच झाला अहे. त्यंच्या आई भारतीय आणि वडील जमैकातील आहेत. हे दोघेही कायमचे अमेरिकेतील स्थलांतरित आहेत. कॅलिकॉर्नियातील सिनेटर असलेल्या हॅरिस यांना जन्माच्या ठिकाणावरून लक्ष्य केले जात आहे, याबाबत माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

हा “जन्मवाद’ अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह सर्व रिपब्लिकनांकडून वाढवला जात आहे. ट्रम्प अध्यक्ष होण्याच्या आगोदरपासूनच हा वाद जोपासत होते. ओबामा यांनाही जन्माने अमेरिकन नसल्याची टीका सोसावी लागली होती. ही चर्चा निरर्थक आहे, असे त्यांनी म्हटले आहे, असे हॅरिस यांनी म्हटले आहे.

ट्रम्प यांनीही या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. हॅरिस अमेरिकेतील कृष्णवर्णीय नाहीत, हा दावा निराधार आहे. पण जर असे खरे असेल, तर किती छान, असे उपरोधिक उद्‌गारही त्यांनी दिले आहेत.

हॅरिस यांनी पुढील वर्षीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जानेवारीपासूनच प्रचाराला सुरुवत केली आहे. जर त्या निवडून आल्या तर अध्यक्ष होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)