भारतीय वंशाच्या व्यक्तीचे अमेरिकी हवाई तळावर अपघाती निधन

न्यूयॉर्क – एका भारतीय वंशाच्या व्यक्तीचे अमेरिकी हवाई दलाच्या तळावर अपघाती निधन झाले. हाफिज काझी (वय 51) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. हाफिजने 21 मार्चला परवानगीशिवाय कॅलिफोर्नियामधील ट्रॅव्हिस हवाई तळामध्ये त्याची मिनीव्हॅन घुसवली.

हवाई तळावर कशाला तरी धडक बसून मिनीव्हॅनने पेट घेतला. या अपघातात हाफिज मृत्युमुखी पडला. या प्रकरणाची अमेरिकेच्या सुरक्षा आणि तपास संस्थांनी गंभीर दखल घेतली आहे. हाफिजने परवानगीशिवाय हवाई तळावर मिनीव्हॅन का घुसवली याचा तपास केला जात आहे. तो 1993 पासूून अमेरिकेत राहतो.

अमेरिकेत त्याच्या कुटूंबातील कुठलाच सदस्य राहत नसल्याचे समजते. हाफिज काही काळ कॅबचालक म्हणून काम करत होता. त्याने हवाई तळावर घुसवलेली मिनीव्हॅन त्याच्याच मालकीची आहे का ते समजू शकलेले नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)